
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :-तालुक्यातील आरसोली येथे पहिल्यांदा भुयारी गटार कामास राष्ट्रवादी महिला लातूर विभाग अध्यक्षा वैशाली मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त या कामाचा शुभारंभ करण्यात आला. गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले असून ग्रामपंचायत च्या वतीने महिलांना समुपदेशन ही करण्यात आले आहे.
पूर्ण गावामध्ये भुयारी गटार करण्यात येणार असून यामुळे सांडपाण्याची व्यवस्था होण्यास मदत होईल तसेच पाण्याची पातळी ही वाढली जाईल.
या कामाचा शुभारंभ मा.सभापती तथा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ओबीसी संजय पाटील आरसोलीकर व सरपंच सुशीला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच गोविंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजुबाई टेकाळे , श्रीराम चंदनशिवे, तानाजी खराडे, शंकर खराडे, सुभाष गोयकर , नागेश पाटूळे, बापूराव पाटूळे, महादेव थेटे, धारलिंग खराडे, दशरथ मोरे , अप्पा तेलंग , महादेव नागटीळक, शिवाजी हिंगमीरे सह नागरिक उपस्थित होते.