
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम: तालुक्यातील पाथरूड येथील ग्रामपंचायत मध्ये नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर क्रीडा व इतर क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने अरबाज शेख या विद्यार्थ्याने १५०० मिटर धावण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होऊन दिल्ली येथे स्पर्धेमध्ये जाण्याची सुवर्ण संधी मिळाली. तसेच सार्थक संतोष बोराडे यांनी जिल्हास्तरीय सायकल रेस मध्ये सहभाग नोंदवून तृतीय क्रमांक मिळवलेला व विभागीय त्याची निवड करण्यात आली. यावेळी समाधान बोराडे यांची पाथरूड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वितरीत करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राहुल गुप्ता यांच्या वतीने कृषी मित्र म्हणून निवड झाल्याबद्दल यानिमित्त पाथरूड ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने त्यांचा पालकांसमवेत जाहीर सत्कार करण्यात आला, पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी सरपंच शिवाजीराव टिकटे,उपसरपंच तानाजी बोराडे,युवासेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे,ग्रामपंचायत सदस्य सेवक टिकटे,अशोक भसाड,धोंडीबा टिळक,शहाजी आठवले,
बाप्पा पवार,युसूफ तांबोळी,सहदेव बोराडे,शिवाजी फाळके,प्रदीप खुणे,तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक गोकुळ टिकटे, अनिल टिकटे,बाप्पासाहेब जाधव,चाचा बोराडे,भास्कर येडे,विजय बोराडे,रामदास घोडके,महारुद्र बोराडे,समाधान दळवे,वैजिनाथ म्हमाने,अण्णासाहेब पवार,रामलिंग टिकटे,संतोष बोराडे,प्रशांत बोराडे,तात्या भोरे,भरत पाटील,बाळासाहेब वडेकर,गौतम बोराडे,दादासाहेब बोराडे,वैजिनाथ वीर,लिपिक अशोक बोराडे,कर्मचारी विलास जाधव,नागेश पवार,योगेश बोराटे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेमध्ये,राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात अनेक विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी बजावली याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.