
दैनिक चालू वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णू पोले.
अहमदपूर: समाजात दिवसेंदिवस व्यसनाधिनतेचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ते कमी करण्यासाठी परिवर्तन संस्था सुमठाणा यांच्या तर्फे व्यसनमुक्ती जनजागृती प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.
दि. ३१डिसेम्बर शनिवार व्यसनमुक्ती दिनानिमित्त अहमद्पुर येथील संस्थेच्या सभागृहात व्यसनमुक्ती जनजागृती शिबीर पार पडले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव बालाजी शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की सध्या समाजात व्यसनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत ,व्यसनामुळे व्यसनी व्यक्ती आणी त्याचा परिवार मानसिक रित्या गोंधळेले आहेत.आर्थिक अडचणी,समाजातील प्रतिष्टा याला व्यसणामुळे खीळ बसत आहे.त्या मुळे समाजातील व्यसनमुक्ती च्या मार्गांवर नेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित हक्क आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ चव्हाण,प्रमुख म्हणून पत्रकार विष्णू आचार्य,राहुल गंडले,शांताबाई येवतीकर,माधव सिरसाठ हे उपस्तिथ होते.या वेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना व्यसना मूळे होत असलेले नुकसान आणी व्यसना वर मनावर ताबा मिळवून आपण आपले जीवन कसे आनंदी जगू शकतो अशा प्रकारे अनमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला उपस्तिथ वैजनाथ मुसळे,अविनाश शिंदे,ललिता खलसे,चंद्रकांत टाकळगावकर, मधुकर कांबळे,शांताबाई काळूंखे,दिगंबर चव्हाण,गणेश टेकाळे,गोविंद वाडीकर,आदी सह मोठ्या संख्येने पुरुष महिला उपस्तिथ होते.