
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन संशोधन केंद्रात प्रा. डॉ. बी. आर. कतुरवार यांच्या मार्गदर्शनाख़ाली पीएच. डी. पदवीसाठी संशोधन करणारी संशोधिका स्नेहल संतोष कुलकर्णी या विद्यार्थिनीस ICSSR ( भारतीय सामाजिकशास्त्रे संशोधन परिषद नवी दिल्ली) या संस्थेकड़ून डॉक्टरल फ़ेलोशिप मंज़ूर झाली आहे.
या विद्यार्थीनीस प्राप्त झालेल्या यशाबदल स्नेहल कुलकर्णी व लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. बी आर कतुरवार यांचे अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य एम एम चमकुडे ,पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी , डॉ. संजय देबडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे.