
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर बस आगारामध्ये चुकीचे ड्युटी लोकेशन करणे, कामाच्या वेळेत बाहेर निघून जाणे, प्रवासी वाहतुकीला अडथळा होणे, त्याचबरोबर परिवहन महामंडळाचे आर्थिक नुकसान होणे आणि आगाराची बदनामी होणे इत्यादी कारणामुळे देगलूर आगारातील सहाय्यक वाहतूक नियंत्रक संतोष ठाकूर यांना १६ डिसेंबर रोजी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. ठाकूर यांचे तडकाफडकी निलंबन आणि ताबडतोब सेवेत घेण्याच्या कार्यवाईमुळे देगलूर तालुक्यातील प्रवासी आणि आगारातील कर्मचारी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.संतोष ठाकूर यांची कार्यपद्धत आतापर्यंत बरीचशी वादग्रस्त ठरली आहे. त्यांनी केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे त्यांना पूर्वीच्या आगार प्रमुखांनी माल विभागात पाठविले होते. त्यानंतरचे आगार प्रमुख संजय आकुलवार यांनी देखील चुकीच्या वर्तनामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केली होती. विद्यमान आगार प्रमुख अमर पाटील यांच्या काळातही ठाकूर यांची सेवा फार कांही समाधानकारक राहिली नाही. आपल्या जवळच्या संबंधातील कर्मचाऱ्यांना आणि यांचा फारसा संबंध नसलेल्या अशा जेष्ठ कर्मचाऱ्यांना ठाकूर हे वेग-वेगळी वागणूक देत असत. जवळच्या कर्मचाऱ्यांना जवळची गावे आणि संबंध नसलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनालाब पडल्याचा त्रासदायक ड्युटी तलावात असत. एवढच
नव्हे तर ज्या मार्गावर प्रवाशांच्या तिकिटातून पैसे चोरण्याची संधी आहे. त्या मार्गावर कांही रक्कम घेऊन वाहकाची ठाकूर ड्युटी लावतात असाही आरोप त्यांच्यावर केला जातो. सहाय्यक वाहतूक नियंत्रक ठाकूर जाणीवपूर्वक चुकीची ड्युटी आलोकेशन करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. वाहने मार्गस्थ होण्याच्या वेळातच जाणून बुजून बाहेर निघून जातात. त्यामुळे नियते थांबतात किंवा नियतांना उशीर होतो. असे प्रकार सातत्याने घडतात. यामुळे प्रवाशाची गैरसोय होऊन परिवहन महामंडळाचे आर्थिक आगाराची बदनामी नुकसान आणि
होते. ही कारणे दाखवून आगार प्रमुख अमर पाटील यांनीसहाय्यक वाहतूक नियंत्रण संतोष रूपसिंग ठाकूर यांना १६ डिसेंबर रोजी सेवेतून तडका फडकी निलंबित केले. – एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानंतर त्याच्यावरील आरोपपत्र तयार करून संबंधित कर्मचाऱ्याला दिले जाते. कर्मचाऱ्यांचे आलेले उत्तर समाधानकारक व वास्तविक आहे. की नाही? त्याची चौकशी करून योग्य तो विचार-विनियम करून निलंबनाच्या संदर्भात निर्णय घेतला जातो. परंतु देगलूरचे आगार प्रमुख अमर पाटील यांनी सहाय्यक वाहतूक नियंत्रक ठाकूर यांना निलंबित करून पुन्हा सेवेत घेतल्यामुळे आगारातील कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवासी जनतेतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आगार प्रमुख अमर
पाटील यांच्याशी संवाद साधला असता, ‘माळेगाव यात्रेचेप्रवासी नियोजन करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून निलंबन मागे घेतले असून ठाकूर यांच्यावरील सर्व आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे’ असे पाटील यांनी सांगितले.