दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई – चार दशकांहून अधिक काळ गुलशन ग्रोव्हर यांनी बॉलीवू़डमध्ये काम केले आहे. आणि प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. बॉलीवूडमध्ये ते बॅड गाय म्हणून लोकप्रिय आहेत. कुठलीही भूमिका तेवढ्याच ताकदीनं साकारण्याची क्षमता असणारे फार कमी अभिनेते बॉलीवूडमध्ये आहेत.
बॉलीवूडमध्ये जे प्रसिद्ध व्हिलन आहेत त्यात सर्वात प्रभावी व्हिलन म्हणून गुलशन ग्रोव्हर यांची वेगळी ओळख आहे. ते बॉलीवूडमध्ये बॅडमन म्हणून प्रसिद्ध आहे. बॉलीवूडमध्ये भलेही त्यांनी खूपदा व्हिलनगिरी केली असेल मात्र ते त्यांच्या रियल लाईफमध्ये फारच सरळ स्वभावी आहेत.आकर्षक व्यक्तिमत्वाचे आहेत. २१ सप्टेंबर त्यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देणार आहोत. गुलशन ग्रोव्हर यांनी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या दिग्गज सेलिब्रेटींसोबत स्क्रिन शेयर केली आहे.
गुलशनने आपल्याला काही करुन अभिनेते व्हायचे असा निश्चय त्यांनी यापूर्वी केला होता. त्यानंतर त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. आता ते नवोदित कलाकारांनाही अभिनयाचे धडे देतात.
एका मुलाखतीमध्ये गुलशन ग्रोव्हर यांनी सांगितलं होतं की, त्यांनी जाणीवपूर्वक खलनायकाची भूमिका करायची असं ठरवलं होतं. त्याविषयी ते म्हणाले होते, जिथं प्रत्येकाला हिरो व्हायचं होतं अशावेळी कुणीतरी व्हिलन व्हायला हवं ना, म्हणून आपण व्हिलन होणं पसंद केल्याचे त्यांनी सांगितलं. व्हिलनचीच भूमिका करण्याचा गुलशन ग्रोव्हर यांचा निर्णय प्रचंड यशस्वी ठरला. त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले.
आतापर्यंत चारशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यात बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यापासून सुपरस्टार रजनीकांत यांच्यापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींसोबत त्यांनी स्क्रिन शेयर केली आहे.


