ठाणे प्रतिनिधी – नागेश पवार
ठाणे : आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आज देवीचे पाठपूजन विधीपूर्वक संपन्न झाले.
येणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन गुढीपाडवा, गुरुवार दि. १९ मार्च २०२६ ते रामनवमी दि. २६ मार्च २०२६ या कालावधीत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब टॉवर, श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जांभळी नाका, ठाणे येथे करण्यात येणार आहे.
या नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी आज पारंपरिक पद्धतीने देवीचे पाठपूजन करण्यात आले. हे पूजन माजी खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी सौ.नंदिनी विचारे यांच्या हस्ते भक्तीभावाने पार पडले.
या प्रसंगी परिसरातील अनेक शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत उत्सवाच्या तयारीला शुभारंभ झाला असून येणाऱ्या नवरात्रोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
