दैनिक चालू वार्ता रिसोड शहर प्रतिनिधी- विजय जुंजारे.
रिसोड// जिल्ह्यातील भर जहागीर येथिल परंतु मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती जि.ए.सानप यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या प्रशासक पदी धर्मादाय आयुकतांनी प्रशासक म्हणून निवड केली आहे.ही बाब वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी भुषणावह आहे.सेवानिवृत्त न्यायमुर्ती जि.ए.सानप यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह नक्कीच जिल्ह्यातील क्रिकेट ला नवसंजिवणी प्राप्त होण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर धर्मादाय आयुक्ततांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवा न्यायमुर्ती गोविंदराव आनंदराव सानप यांची एमसीए प्रशासक पदी कार्य न्यायीक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरळीत चालविण्याची जबाबदारी मिळाली आहे.
सेवानिवृत्त न्यायमुर्ती गोविंदराव आनंदराव सानप यांची मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपीठावर न्यायमुर्ती पदी आसतांनी वाशीम जिल्हाचे पालक न्यायमुर्ती म्हणुन जबाबदारी आली आसतांनी त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रिसोड – कारंजा येथिल जिल्हा व सत्र न्यायालयाच्या भव्य इमारती साठी मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.रिसोड येथिल जिल्हा व सत्र न्यायालयाला मंजुरात प्राप्ती नंतर सुमारे सात एकर जागा मंजुर करण्यात मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.त्याच प्रमाणे जागतिक का-या पाण्याचे लोणार सरोवरांचा कोट्यावधीचा विकास आराखडा निर्माणा साठी कोट्यावदमधीचा निधी उपलब्धते साठी सिंहाचा वाटा लाभलेला आहे.न्यायमुर्ती सानप यांना शालेय जिवनापासुन क्रिकेट खेळाचा छंद होता.या संदर्भात आजही त्यांच्या भर जहागीर या मुळ गावी अनेक किस्से अधोरेखीत आहेत.त्यांच्या निवडीने निश्चितच महाराष्ट्रातील क्रिकेटसह वाशीम जिल्ह्य़ातील क्रिकेट ला नवसंजिवणी प्राप्त होण्यास एक नवीन संधी उपलब्ध झाल्याने भर जहागीर सह रिसोड तालुक्यामध्ये आनंदत्सोव साजरा होत आहे.
सेवानिवृत्त न्यायमुर्ती गोविंदराव आनंदराव सानप
(महाराष्ट्र क्रिकेट संघटना प्रशासक मुंबई)
= न्यायालयीन प्रक्रिये मध्ये न्यायदानाचे कार्य करतांनी अनेक जबाबदा-या माझ्या माध्यमातून योग्यरित्या न्यायदानाचे कार्य केलेले आहे.क्रिकेट हा खेळ प्रारंभी पासुनच आवडीचा आहे.आणि एमसीए क्रिकेट ची जबाबदारी मिळाली आहे.निश्चित क्रिकेट च्या सर्वांगीण विकासाला योग्य चालना देण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.
