ठाणे प्रतिनिधी नागेश पवार
ठाणे- राबोडी पोलीस ठाण्याचे हद्दीत सन २०२४-२०२५ मध्ये मोबाईल फोन हरविलेबाबतच्या वेळोवेळी तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने मपोहवा/६७२५ यशोदा घोडे, पोहवा/२४५८ सशांक सांवत, पोना/७२६१ समाधान माळी यांचे एक तपास पथक मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली हरविलेले मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आले होते.
सदर पथकाने हरविलेल्या मोबाईल फोनचा शोध घेणेकरीता संबधित मोबाईल कंपनीचे सर्व्हिस प्रोव्हायडर यांचेशी पत्र व्यवहार करून, मोबाईल फोन कंपनीकडुन मोबाईल फोनसंबंधीची तांत्रिक माहिती प्राप्त करून घेतली. प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून एकुण ५२ मोबाईल फोन (किंमत ५,१०,०००/- रुपये) हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
सदर मोबाईल फोन हे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, श्री. सुभाषचंद्र बुरसे (अतिरीक्त कार्यभार विशेष शाखा पोलीस उप आयुक्त), श्रीमती मिना मकवाना, सहाय्यक पोलीस आयुक्त, नौपाडा विभाग श्री. संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत चंद्रकांत पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. कृष्णा भोये, आणि पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्रीमती मंदाकीनी चोपडे, राबोडी पोलीस स्टेशन यांचे हस्ते संबधित मोबाईल मुळ मालकांना परत करण्यात आले.
