{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा औंध प्रतिनिधी -निहाल मणेर
मत नाही, मातृत्व बोलतंय! मनीषा फडतरे यांच्या समर्थनार्थ महिला वर्ग भावुक….
ही निवडणूक नाही… लेकीची लढाई आहे!” – मनीषा फडतरे यांच्या पाठीशी महिला शक्ती एकवटली…
औंध :-जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणीच्या गावचा स्वाभिमान जिल्हा परिषदेच्या उमेदवार मनीषा फडतरे यांच्या प्रचाराला वेग आला असून, गावोगावच्या महिला व ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. “आपल्या लेकीला साथ देऊया” या भावनिक सादेने संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. महिला वर्ग विशेषतः भावुक होत मनीषा फडतरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे चित्र दिसत आहे.
गावोगावी बैठका, घरभेटी आणि संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांनी पुढाकार घेतला आहे. पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी यांना फोन, प्रत्यक्ष भेटी आणि सोशल माध्यमांतून मतदानाचे आवाहन केले जात आहे. “ही लढाई एका उमेदवाराची नसून, महिलांच्या सन्मानाची आणि सक्षम नेतृत्वाची आहे,” अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली.
मनीषा योगेश फडतरे या स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या, अभ्यासू आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. महिला, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर त्यांचा स्पष्ट अजेंडा असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
प्रचारादरम्यान महिलांनी पारंपरिक पद्धतीने एकत्र येत गीत, घोषणा आणि अनुभवकथनातून समर्थन व्यक्त केले. आमची लेक जिल्हा परिषदेत गेली पाहिजे, असा विश्वास अनेक माता-भगिनींनी व्यक्त केला. तरुणींनाही प्रेरणा मिळत असून, नेतृत्वात महिलांचा सहभाग वाढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकूणच जिल्हा परिषद निवडणुकीत मनीषा फडतरे, शुभम शिंदे, मनोज देशमुख यांच्या प्रचाराला भावनिक, सामाजिक आणि संघटित पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. येत्या मतदानात हा उत्साह मतपेटीत उमटेल, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
माता भगिनींचा केलेला सन्मान आम्ही विसरणार नाही:-श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी,योगेशभाऊ फडतरे, शुभम शिंदे यांनी औंध गटातील जवळपास सहा हजार महिलांचा केलेला सन्मान आम्ही विसरणार नाही अशा महिला भावना व्यक्त करीत आहेत.
