मावळ इंदुरी प्रतिनिधी
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा जोर
वाढला असून, इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने मेघाताई भागवत श्रीकुष्ण भेगडे आपल्या आक्रमक आणि नियोजित प्रचारामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. विकासाचा संकल्पनामा प्रसिद्ध केला असून, हायटेक प्रचारावर जोर दिला असल्याने त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
इंदोरी वराळे गटामधील भाजपच्या उमेदवार मेघाताई भागवत श्रीकुष्ण भेगडे रवि भाऊ शेटे हे मतदारांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक वाडी-वस्तीवर बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज मैदानात उतरली आहे. गटातील प्रत्येक बूथस्तरावर सूक्ष्म नियोजन केले
विरोधकांसमोर भाजपचे मोठे आव्हान; पदाधिकाऱ्यांना विश्वास
असून, भारतीय जनता पार्टीने केलेली विकासकामे आणि पक्षाची विचारधारा घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहचत आहोत. इंदोरी वराळे गटात सुज्ञ नागरिकांनी भाजप उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जनतेचा कौल पाहता भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा आत्मविश्वास इंदोरी वराळे गटातील भाजपचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे व्यक्त केला आहे.
भाजपने प्रचारात घेतलेली ही आघाडी पाहून विरोधी पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्यांच्या कारभारामुळे या वेळी मतदारांनी भाजपचे तीनही उमेदवार निवडून देण्याचे ठरविले आहे. तरुण आणि महिला मतदारांचा भाजपला पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे.
