जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा जोर वाढला असून, म्हाळुंगे नानेकरवाडी गट जिल्हा परिषद गटात जिवन मोहन खराबी ठाकरे गट मशाल शिवसेना पक्षाने आपल्या आक्रमक आणि नियोजित प्रचारामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शिवसेना ठाकरे गट जिवन खराबी अधिकृत उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. विकासाचा संकल्पनामा प्रसिद्ध केला असून, हायटेक प्रचारावर जोर दिला असल्याने त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
म्हाळुंगे नानेकरवाडी गटामधील उमेदवार जिवन खराबी हे मतदारांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक वाडी-वस्तीवर बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज मैदानात उतरली आहे. गटातील प्रत्येक बूथस्तरावर सूक्ष्म नियोजन केले
असून, खेड आमदार बाबाजी काळे केलेली विकासकामे आणि पक्षाची विचारधारा घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहचत आहोत. म्हाळुंगे नानेकरवाडी गटात सुज्ञ नागरिकांनी शिवसेना (ठाकरे गट)उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जनतेचा कौल पाहता शिवसेना ठाकरे गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा आत्मविश्वास म्हाळुंगे नानेकरवाडी गटातील मशाल शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारात घेतलेली ही आघाडी पाहून विरोधी पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्यांच्या कारभारामुळे या वेळी मतदारांनी शिवसेना ठाकरे गटाचे तीनही उमेदवार निवडून देण्याचे ठरविले आहे. तरुण आणि महिला मतदारांचा शिवसेना ठाकरे गट पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे.


