
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्हा परिषद गट महातपुरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महिला मेळावा अगदी थाटात संपन्न झाला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राष्ट्रीय महिला मुक्ती दिन या औचित्यावर खांबेगाव-महातपुरी ग्रुप ग्रामपंचायतच्या शिक्षण लोकप्रिय व आदर्श सरपंच सौ. मुक्ताबाई गजानन कदम यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
जिल्हा परभणी व तालुका पूर्णा क्षेत्रातील मौजे ताडकळस येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, महातपुरी केंद्र येथे या पवित्र दिनी भव्य अशा महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकप्रिय व आदर्श सरपंच सौ.मुक्ताबाई गजानन कदम यांनी भूषविले होते. उद्घाटक म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा मान्यवर भगवंतजी देसाई हे आणि तर प्रमुख अतिथी म्हणून ताडकळस केंद्र प्रमुख तथा राष्ट्रवादी शिक्षक संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष हे मान्यवर लाभले होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन बापुराव कदम, उपसरपंच सौ. इंदुमतीताई एडके, हटकरवाडी प्रा.शाळेतील सुरेश लोखंडे, महातपुरीचे पोलीस पाटील रामभाऊ कस्तुरे, रामप्रसाद (मुन्ना) सावकार, ग्रामसेवक सौ. संगिता ससाणे मॅडम, शेषेराव जी मोहिते मामा, समस्त महिला वर्ग यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषा परिधान करुन कार्यक्रमाची शोभा वाढविली तर अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सुप्त गुणांना वाव दिला. यावेळी उपस्थित सर्वांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला.
केंद्रप्रमुख विनोदकुमार कनकुटे यांनी माता सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण अशा शब्द शृंखलेत सजवून ते उपस्थित मान्यवर, महिला मंडळ व समस्त विद्यार्थी गण यांना मार्गदर्शक ठरु शकेल असेच विशद केले. विद्यार्थ्यांची वाढती शैक्षणिक गुणवत्ता ध्यानी घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक तर केलेच शिवाय त्यांची विकासात्मक गुणवत्ता वाढीस लावणाऱ्या, त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचेही अभिनंदन मानले. एकूणच काय तर सदर शाळेतील सर्व विद्यार्थी या गावाचे भावी नागरिक तर आहेतच शिवाय ते गावाच्या सर्वांगीण विकासाचे उज्ज्वल भविष्य ठरणार असल्याचेही श्री. कनकुटे यांनी निर्देशीत केले.