
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता. प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- जानकी महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रदीपखोमणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. सावित्रीबाई फुले हे थोर समाजसुधारक होते .त्यांच्या मुळे शिक्षण क्षेत्रात अमूल्य असा बदल घडून आला .तसेच आजचा दिवस हा महिला मुक्ती दिन , बालिका दिन म्हणून साजरा केला जातो असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रदीप खोमणे यांनी व्यक्त केले .तसेच या कार्यक्रमास अध्यक्ष श्री प्रदीप खोमणे ,अजय स्वामी,गोपाळ म्हेत्रे ,सुवर्णा गोरे, विद्यासागर धूळगुंडे ,सुचिता हारे,गायकवाड उमादेवी,उद्धव बेंबडे,सलीम पठाणव इतर कर्मचारी व विद्यार्थी हे उपस्थित होते.