
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
___________________________________
नांदेड दिनांक (06 जानेवारी): जिल्हा परिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षकांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर पदोन्नतीच्या हक्का पासून वंचित ठेवणारा 28 डिसेंबर 2022 चा शासनादेश रद्द करावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आणि सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री व नियोजन मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाने या बाबतीत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की राज्यातील जिल्हा परिषदेत कार्यरत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना सेवाजेष्ठतेनुसार उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर पदोन्नती दिली जात होती. परंतू शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवेतील उपशिक्षणाधिकारी, गट-ब या पदांचे सेवा प्रवेश नियम राजपत्र 2022 नुसार जिल्हा परिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षकांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर पदोन्नतीच्या हक्का पासून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या शिक्षकांची पदोन्नतीची एकमेव संधी हिरावून घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात कार्यरत माध्यमिक व उच्च माध्यमिक गुणवत्ता धारक पात्र शिक्षकांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे या शिक्षकांमधे प्रचंड असंतोष आणि नाराजी निर्माण झाली आहे. याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षकांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर पदोन्नती नाकारणारा 28 डिसेंबर 2022 चा शासनादेश रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष ए. बी. औताडे,सहसचिव सौ.रेखा सोळूंके ,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार ,सचिव रविद्र वाकोडे , शहराध्यक्ष बी.डी.नाईक सचिव टिमकीकर बी.एम,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.विजयालक्ष्मी स्वामी,के.का.स.जी.पी.कौसल्ये ,ई.डी.पाटोदेकर ,जिल्हा कार्याध्यक्ष बी.डी.जाधव,कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील ,उपाध्यक्ष मठपती एम.एस.,क्लायमेट अलाडा,बडूरे जी.पी.,आनंद मोरे,सहचिव आर.पी.वाघमारे ,नरेश पाकलवार,संजय रेकूलवार,रायकोड नागोराव, अनिल सुगावकर ,संभाजी बुड्डे,विनोद भुताळे ,गजानन रणखांब,वडवळे,रमेश सज्जन ,प्रा.आनंद कर्णे ,शिवानंद स्वामी,आर.पी.ब्याळे,अब्दूल हसिब,राजेश कदम,संजय केंद्रे ,शिवराज कदम, श्रीगिरे सर यांच्यासह सर्व पदाधिका-यांनी केली आहे.