
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सूर्या हॉस्पीटलच्या संयुक्त प्रयत्नाने आज दर्पण दिनानिमित्त आयोजित आरेाग्य तपासणी शिबीरामध्ये 150 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वप्रथम पत्रकारांनी आपले आरोग्य जपावे असे भावनिक आवाहन केले.
या निमित्ताने आयोजित ‘दर्पण दिन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजगोपाल कालानी, सूर्या हॉस्पीटलचे संचालक डॉ.संजय खिल्लारे, डॉ. संदिप काला, डॉ. प्रविण संगवे, डॉ. महेश कडे, डॉ. आसाराम लोमटे, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, प्रविण देशपांडे, राजकुमार हट्टेकर, प्रभू दिपके आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना विनय मून यांनी पत्रकार आणि प्रशासन यांचे काम सदैव धकाधकीचेच असते, दोन्ही घटक आपापल्या परिने काम करत असतात. मी या ठिकाणी नवीन असलो तरीही जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य क्षेत्रात अनेक ठिकाणी आपणास काम करावयाचे आहे. पत्रकारांनी या बाबत प्रशासनाला सहकार्य करावे, सर्वांनी आपले आरेाग्य राखावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप म्हणाले की, जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात आपण घेतलेला पुढाकार स्तूत्य असल्याचे सांगत दर्पण दिनानिमित्त त्यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. डॉ. राजगोपाल कालानी यांनी आपली दिनचर्या कशी असावी या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. संजय खिल्लारे, डॉ. प्रविण संगवे, डॉ. आसाराम लोमटे यांनीही बहुमोल असे विचार मांडले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात आयएमएच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. राजगोपाल कालानी यांचा सूर्या हॉस्पीटल आणि पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंचक खंदारे, प्रास्ताविक राजकुमार हट्टेकर यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश नाईकवाडे यांनी मानले.
कार्यक्रमापूर्वी सकाळच्या सत्रात सुमारे 150 पत्रकारांच्या मधुमेह, रक्तदाब, इसीजी, पोटाचे विकार आदी तपासण्या करण्यात आल्या. शिबीराच्या यशस्वीतेसाठी सूर्या हॉस्पीटलचे महेंद्र देशमुख यांच्यासह महालॅबचे सय्यद कामील, अविनाश येडेकर, मंजूषा एडके, पंकज मोताळे, प्रल्हाद फेगडे, साबेर अन्सारी, ज्ञानेश्वर कायंदे, शरद जाधव, संगीता धबाले, लक्ष्मण आवाड, जयेंद्र गायकवाड, राहूल अग्रवाल, तुषार टेंगळे यांनी परिश्रम घेतले. या आरेाग्य तपासणी शिबीरावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने, हेमंत कौसडीकर, जकीयोद्दीन खतीब, नेमीनाथ जैन, लक्ष्मीकांत बनसेाडे, लक्ष्मण मानोलीकर, दिलीप बोरुळ, माणिक शिंदे, मोईन खान, सय्यद युसूफ, भूषण रोकडे, राजा पुजारी, सुदर्शन पुजारी, मोहमद युसूफ, रामेश्वर शिंदे, अरुण पवार, मदन कोल्हे, संजय घनसावंत, अनिल लांडगे, रमेश नाटकर, प्रभू दिपके, सोमेश लाहोरकर, देवानंद वाकळे, भूषण मोरे, लक्ष्मण समेटा, प्रदिप लांडगे, माणिक रासवे, संघपाल अढागळे, शरद कुल्थे, किरण स्वामी, सुनिल सुतारे, बळीराम जोगदंड, गणेश मुटकुळे, हेमंत मुथा, शिवाजी वाकोडे, प्रकाश गुंड, अब्दुल रहिम खान, मंचक खंदारे, भगवान सूर्यवंशी, पुष्पा बनसोडे, पवन मुंदडा, राजकुमार हट्टेकर, अब्दुल रहिम, बाळासाहेब शिंदे, सयद जमील, राजू कर्डीले, प्रवीण देशपांडे, प्रशांत कौसडीकर, सय्यद रईस, विजय पानबुडे, अनंता रेनगडे, पद्माकर चोपडे, श्रीमंत सरोदे, प्रसन्न लाठकर, बळीराम सुक्रे, मंदार बर्दापूरकर, पांडूरंग अंबुरे, सय्यद खिजर, भगिरथ बद्दर, सय्यद रफीक, ओमकार भुसारे, शेलेश काटकर, नरहरी चौधरी, लक्ष्मीकांत जवळेकर, देवानंद नावकीकर आदींची उपस्थिती होती.