
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..बाळासाहेबांची शिवसेनाचे तालुकाध्यक्ष उदयसिंह बोराडे यांच्या तर्फे दर्पण दिन 06 जानेवारी 2023 शुक्रवार रोजी पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आपल्या मनोगतात. पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांनी निष्पक्ष असे लिखाण करावे,वस्तुस्थिती लिहावी असे आवाहन आपल्या मनोगतातून बोराडे यांनी केले यावेळी व्यासपीठावर गजानन कापसे, दिलीप हिवाळे, चांद भाई पठाण, लिंबाजी बोराडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना बोराडे म्हणाले की समाजात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्याचे काम पत्रकारांनी करावे, जेथे अन्याय तेथे लिखाण करा व तुमच्यावर अन्याय झाल्यास बाळासाहेबांची शिवसेना सदैव तुमच्या सोबत राहील. यावेळी पीसीएम पत्रकार संघाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष आशिष तिवारी, उपाध्यक्ष रवींद्र भावसार, गजानन माळकर, सचिव शेख अशपाक, कोषाध्यक्ष सचिन नरवाडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मोरेश्वर बोराडे, दैनिक दिव्य मराठीचे प्रदीप देशमुख, सुरेश दवणे, बाळासाहेब खराबे, सुभाष वायाळ, स्नेहल हिवाळे, मुरलीधर बिडवे, जीवन काळे, योगेश गणगे, सोनाजी जाधव, ज्ञानेश्वर नेवरे, प्रकाश जाधव, नवनाथ चट्टे, दत्ता खरात आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष आशिष तिवारी व सर्व पदाधिकाऱ्यांचा तालुकाध्यक्ष उदय बोराडे यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.