
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी करिता प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यात ७५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.तर प्रसिध्द केलेल्या यादीत ५६ हजार ६२९ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.याशिवाय नोडल अधिकाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली.विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी होऊ घातली आहे. याकरिता गुरुवारपासून नामांकन अर्ज स्वीकारण्या ची प्रक्रिया सुरू झाली.३० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली असून यामध्ये ५६ हजार ६२९ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.तर २ जानेवारीपर्यंत यामध्ये नोंदणी झालेल्या मतदारांची पुरवणी यादी जोडली जाणार आहे.मागील २०१७ च्या निवडणुकीत जिल्ह्यात ७६ हजार मतदार असताना यावेळी मात्र यात मतदारांचा टक्का घरसला आहे.प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीत शहरात सर्वाधिक २७ हजार ८०३ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.त्या पाठोपाठ अचलपूर तालुक्यात ५ हजार १३३ मतदार आहेत.सर्वात कमी मतदार चिखलदरा तालुक्यात केवळ ३४६ मतदार आहेत. जिल्ह्यात ३३ हजार २३६ पुरुष,२३ हजार ३२९ महिला तर ६४ इतर मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यात आला आहे.जिल्ह्यात सर्वाधिक मतदार केंद्रदेखील शहरात ४१ राहणार आहे. याशिवाय निवडणुकी करिता १२ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या नियोजना बाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी माहिती दिली.पदवीधर पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी,निवडणूक अधिकारी नितीन व्यवहारे,जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,नायब तहसीलदार श्याम देशमुख आदी उपस्थित होते.