
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
▪️ उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन सादर;तर अंजनगाव सुर्जी तालुका कृषी अधिकारी यांची कार्यालयात गैरहजेरी
—————————————-
अमरावती :-यावर्षी चांगले पीक होईल असा अंदाज शेतकऱ्यांचा होता.परंतु गेल्या काही दिवसापासून निसर्गाच्या आपत्तीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना अंजनगाव सुर्जी येथील कृषी अधिकाऱ्यांचीच कार्यालयात गैरहजरी आढळून आली.
सदर माहिती अशी की अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यात तुर पिकावर आलेल्या रोगराईमुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करण्याबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने आज दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय दर्यापूर तसेच स्थानिक तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्याकरिता गेले.परंतु अंजनगाव सुर्जी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते निवेदन देण्याकरिता गेले असता तालुका कृषी अधिकारीच अनुपस्थित असल्यामुळे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन द्यावे लागले.
अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यामध्ये तूर या पिकावर रोगराई आल्याने तोंडाशी आलेले तुरीचे पीक पूर्णपणे रोगराई व निसर्गाच्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून गेला आहे.त्यामुळे संपूर्ण भागातील ६० ते ७० टक्के तुरीचे पीक शेतकऱ्यांचे हातातून निघून गेले आहे.गेल्या वर्षभरापासून बळीराजाला वारंवार संकटांना सामोरे जावे लागत असून त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी पूर्णपणे हतबल झालेले आहे.जर कृषी अधिकारी आपल्या कार्यालयात अनुपस्थित असतील तर शेतकऱ्यांनी न्याय मागावा कुठे?असा प्रश्न बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने यावेळी करण्यात आला.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नंदकिशोर पाटील जांभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल नागे,निवृत्ती पाटील बारब्दे,मुन्नाभाऊ इसोकार,स्वप्निल पाटील लहाने,विजय पाटील धुमाळे,विश्वजीत रायलकर प्रमोद रेचे,मीनाक्षीताई कपले,ज्वाला रेखाते,संतोष धर्मे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते