
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी- शहाबाज मुजावर.
पन्हाळगडावरील ऐतिहासिक मोरोपंत ग्रंथालय येथे. आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. 6जानेवारी 1932 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नियतकालित चालू केले होते.महाराष्ट्र शासनाने 6 जानेवारी हा दिन पत्रकार दिन म्हणून घोषित केले .आज 191 वा मराठी पत्रकार दिन संपूर्ण महाराष्ट्र भर साजरा होत आहे.त्याच ओचित्य साधून आज ज्येष्ठ पत्रकार आनंद जगताप, राजु दळवी ,नितीन भगवान, राजू मुजावर,यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजीवन पब्लिक स्कूलचे सचिव , पी .आर .भोसले सर होते. तसेच अध्यक्ष स्थानी पन्हाळा गिरीशस्थान नगरपरिषद ची मुख्याअधिकारी चेतन्य माळवी होते.
या कार्यक्रमा मध्ये मनोगत व्यक्त करताना निवृत्त माहिती संचालक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मिलिंद बांदिवडेकर म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांचा इतिहास फार मोठा आहे.अत्यंत कमी वयात त्यांनी पत्रकार क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. मी अनेक जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.यामध्ये मला असे दिसून आले प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांचे मतभेद असतात ते पत्रकारांनी विसरून एकत्र यावे व समाजउपयोगी कामे करावेत तसेच पन्हाळातील एक भव्य दिव्य पत्रकारभवन निर्माण व्हावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली . तसेच भोसले सर म्हणाले की, जसे शाळेमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा आहे. तसे समाजामध्ये वावरत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकार महत्त्वाचा आहे.तो समाजाला योग्य प्रकारे दिशा देऊ शकतो घडू शकतो. तसेच पन्हाळाच्या पत्रकारांची परंपरा जशीच्या तशी ठेवावी जे चांगल्याला चांगले म्हणतात वाईटाला वाईट म्हणातात जसे की,पन्हाळ्याचे कै. ज्येष्ठ पत्रकार अल्ताफ मोकाशी, बाळासाहेब भोसले, आपल्या लेखणीतून मांडत होतेत तसेच मांडावे तसेच पत्रकारभवन स्थापन करण्यासाठी जी काय मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष, विजय पाटील, असिफ मोकाशी, रूपाली धडेल उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल , पन्हाळा तालुका पोलीस पाटील संघटना अध्यक्ष, भीमराव काशीद प्राणी मित्र मिलिंद गुळवणी, शहादुद्दीन (बाळू) मुजावर, तसेच सर्व पत्रकार गावातील नागरिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होतेत.