
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर– रायगड मित्र परिवार व अहमदपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.अहमदपूर यांच्या वतीने श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय अहमदपूर व श्री संत ज्ञानेश्वर महाराज मतिमंद विद्यालय अहमदपूर येथे तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी रायगड मित्र परिवार व अहमदपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.अहमदपूर यांच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविला त्या मध्ये एक वर्ग डिजिटल पद्धतीने तयार केला त्याच बरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. आज पत्रकार श्री बालाजी तोरने यांचा वाढदिवस शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्या सोबत साजरा केला. सर्व पत्रकार बांधवांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. संस्थेचे सचिव मा. विकास साहेब तपशाळे यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी स्वामी सर, तत्त्तापुरे सर, गणेश हलसे सर यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री बिरादार सर यांनी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी रायगड मित्र परिवार व अहमदपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.अहमदपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्याच बरोबर सुपे सर, हळणे सर, रितपुरे सर,वाडीकर सर,आगलावे सर,वानखेडे सर, चिमले सर,मेश्राम सर, पवार मॅडम,कांबळे मॅडम, शिंदे सर, बोरोळे सर व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली