
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी- संतोष भसमपुरे
तालुक्यातील लेंडेगाव, वैरागड,बोरगाव(खुर्द) ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2023 मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ.विद्या रमेश कांबळे या बहुमताने निवडून आल्या असून दिनांक सहा जानेवारी रोजी झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडीदिनी श्री. कोंडीबा गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.स्वरुप चिरके हे होते. ग्रामपंचायतच्या सदस्य पदी(1)सौ.सुरेखा इंद्रजित केंद्रे,(2)सौ.मिना विजय कांबळे(3)प्रभाकर मरीबा कांबळे(4)शांताराम व्यंकटराव माने(5)देवकत्ते पुष्पा राजीव(6)उत्तमराव शंकरराव टेकाळे(7)सौ.रुपाली दत्ता कोंपले (8) सौ.प्रतिभा भगवान ससाने हे सदस्य म्हणुन निवडुन आले आहेत. या निवडीसाठी लेंडेगाव,वैरागड,बोरगाव(खुर्द) येथिल सर्व नागरीकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.