
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर :- पत्रकारितेची पायाभरणी करणारे ,दर्पणकार तथा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे पत्रकारितेचे ” जनक ” दर्पणकार”बाळशास्त्री जांभेकर यांनी दि.६ जानेवारी १८३२ रोजी” दर्पण ” हे मराठीतील पहिले नियतकालिके सुरू करून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती.त्यांचे स्मरणात आजचा हा दिवस सर्वत्र ” दर्पण दिन” म्हणून साजरा केला जातो.याच दिनाचे औचित्य साधून उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार बांधवांचा विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात सकाळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष देविदास डांगे यांच्यासह अन्य पत्रकार बांधवांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी कंधार तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाउपाध्यक्ष अमजदखान पठाण,अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, सचिव प्रदीप देशमुख, लक्ष्मण कांबळे, देविदास डांगे,लक्ष्मण भिसे, सुर्यकांत मालीपाटील, विठ्ठल ताटे पाटील, संभाजी काळम पाटील, गावातील प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ नागरिक विश्वाभंर पा.घोरबांड,ग्रा.पं.सदस्य शिवशंकर काळे, अतिक पठाण ,सद्दाम पिंजारी, यांच्या सह अनेक जन उपस्थित होते.
उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक जयवंतराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली छोटेखानी ऑफिस मध्ये दर्पण दिनानिमित्त उस्माननगर पत्रकारांचा पेन ,वही ,शाल पुष्पहार घालून पत्रकारांचा गौरव करण्यात आला.यावेळी शाळेचे सहशिक्षक एकनाथ केंद्रे,खान , यांची उपस्थिती होती. सम्राट अशोक प्राथमिक शाळेत संस्थाचालक देवरावजी सोनसळे यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा दर्पण दिन साजरा करण्यात आला.पत्रकाराचे शस्त्र म्हणून असलेलं पेन ,वही, पुष्पहार घालून गौरविण्यात आले.यावेळी शाळेतील मुख्याध्यापक राहुल सोनसळे, देविदास डांगे, भगवान राक्षसमारे,मन्मथ केसे,नितिन लाटकर, माजी सरपंच प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते आमिनशा फकीर , व्यंकटराव घोरबांड ,यांची उपस्थिती होती.जि.प.प्रा.कन्या शाळेत मुख्याध्यापिका सौ.विद्या वांगे यांच्यावतीने पत्रकार बांधवांचा पेन वही शाल पुष्पहार अर्पण करून दर्पन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील सहशिक्षिक गौतम सोनकांबळे, पांडागळे, सुर्यवंशी, उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय उस्माननगर यांच्या वतीने उस्माननगर ग्रामीण मराठी पत्रकार भवन येथे पत्रकारांचा पेन व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला .यावेळी सरपंच प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड, आमिनशाह फकीर , काँग्रेस कार्यकर्ते नरेश शिंदे,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर भिसे,तेजस भिसे आदि उपस्थित होते. यावेळी परिसरातील ज्वलंत प्रश्नाची वाचा फोडून समाज कार्य करावे असे आवाहन केले.यानंतर पोलीस प्रशासन पोलिस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.त्यातील दर्पण दिनानिमित्त उस्माननगर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष अधिकारी सपोनि पी.डी.भारती व कर्मचारी यांच्या वतिने पत्रकारांचा पेन, पुष्पहार देवून यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी अनेकांनी पत्रकारांना बोलताना म्हणाले की, उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून पत्रकारांनी निर्भिडपणे पत्रकारीता करून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली .