
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-जिल्हाधिकारी अमरावती,मुख्य कार्यकारी अधिकारी,महापालिका आयुक्त,जि.प. समाज कल्याण विभाग,आदर्श जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र,अमरावती विकलांग जीवन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ८ ते २३ जानेवारी दरम्यान दिव्यांगांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यामध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयव,योग्य साहित्य देण्यासाठी आरोग्य तपासणीसह जागतिक ओळखपत्र (यूआयडी कार्ड) नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.असे आवाहन जि.प.चे समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर,पुनर्वसन केंद्राचे समन्वयक संचालक आर.एस.कोंडे यांनी केले आहे.सर्व शिबिरे सकाळी १० ते सायंकाळी ६ केले गेले आहेत.
अचलपूर आणि चांदूरबाजारसाठी ८ जानेवारी रोजी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जीसाठी ९ जानेवारीला दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आयोजन करण्यात येणार आहे.१२ जानेवारीला धामणगाव आणि चांदूर रेल्वेसाठी धामणगाव रेल्वे ग्रामीण आरोग्य केंद्र येथे आयोजन करण्यात येणार आहे.मोर्शी आणि वरूडसाठी १३ जानेवारीला मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजन करण्यात येणार आहे.१६ जानेवारीला तिवसा आणि भातकुली येथील तिवसा उपजिल्हा रुग्णालयात शिबिरे आहेत.१८ जानेवारी रोजी धारणी उपजिल्हा रुग्णालयात शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.१९ जानेवारी रोजी चिखलदरा ग्रामीण रुग्णालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तर २१,२२ व २३ जानेवारी रोजी नांदगाव खंडेश्वर,बडनेरा व अमरावती शहर येथे अमरावती-बडनेरा रोड नवाथे नगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात शिबिरे आयोजित करण्यात आली आहे.सर्व संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालकांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९९७०६२६५३४ व क्षेत्र अधिकारी ७५८८८६९९१८ यांच्याशी संपर्क साधावा.या योजनेच्या लाभासाठी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र,अमरावती यांच्याकडून प्रसिध्दी पत्रकात संचालकांनी अपंग वैद्यकीय प्रमाणपत्र,आधारकार्ड,वार्षिक १ लाख उत्पन्नाचा पुरावा,शाळेची टी.सी.,२ पासपोर्ट आकाराचे फोटो इ.कागदपत्रांसह जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र अमरावती द्वारा परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.