
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त शुक्रवारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ कार्यालय,टिपरे भवन,अंजनगाव सुर्जी येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुधाकरराव टिपरे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती सांगून,त्यांचा ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यात आला.तसेच,यावेळी उपस्थित पत्रकारांचा सन्मान करून,लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे महत्व सांगितले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.तालुकाध्यक्ष सुधाकरराव टिपरे,उपाध्यक्ष रमेश सावळे,उपाध्यक्ष प्रेमदास तायडे,सचिव मनोज मेळे,सहसचिव मंगेश इंगळे, संघटक महेश वाकपांजर,कोषाध्यक्ष सुशील बहिरे,तसेच अखिल भारतीय ग्रामीण संघाचे नवनियुक्त शहराध्यक्ष श्रीकांत नाथे आणि तालुका सदस्य कार्यकारिणीत पंकज हिरुळकर,सतीश ढगे,संघरतन सरदार,ज्ञानेश्वर दांडगे,पवन हातेकर,सुशील पाखरे,प्रमोद खडे,दिनेश येवले,सचिन इंगळे आदि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उपस्थित पत्रकार मान्यवर यावेळी उपस्थित होते.