
दैनिक चालु वार्ता उपसंचालक नांदेड-गोविंद पवार
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दि. ७ जानेवारी रोजी लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुर्यवंशी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या चव्हाण परीवारांचे व नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या सुर्यवंशी कुटुंबीयांचे कै. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या काळापासून जुने कौटुंबिक ऋणोनुबंध आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचे काका माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांचे जिगरी दोस्त आहेत.
नुकतेच २९ डिसेंबर २०२२ रोजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचे वडील सुभाष सावकार सुर्यवंशी यांचे निधन झाल्याबद्दल सुर्यवंशी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री हे दि.७जानेवारी रोजी वेळातील वेळ काढून लोहा येथील देऊळगल्लीत नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी येवून नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांची भेट घेऊन सुर्यवंशी कुटुंबीयांचे सांत्वन केले व नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांची विचारपुस केली व सुर्यवंशी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले.
यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत ,आ. अमर राजूरकर,आ.मोहन अण्णा हंबर्डे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, संतोष पांडागळे , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, माजी अध्यक्ष रंगनाथ भुजबळ,नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक संदीप दमकोंडवार,अमोल व्यवहारे,नबीसाब, माजी जि.प. सदस्य श्रीनिवास मोरे, आदी उपस्थित होते.