
दैनिक चालू वार्ता राजगुरूनगर ता. प्रतिनिधी-मयुरी वाघमारे.
===================
राजगुरूनगर :- चांडोली राजगुरूनगर ता. खेड, जि. पुणे.
आज शनिवार दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते 2 ह्या वेळेत चांडोली सरकारी दवाखान्यात जवळ सद्गुरू चैतन्य मेडिकल शेजारी चांडोली या ठिकाणी देवा वेलनेस परिवारातर्फे मोफत बॉडी फॅट चेकअप आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. यामध्ये बॉडी फॅट आणि त्या वरील उपाय यावर मोफत विश्लेषण या ठिकाणी देण्यात आले.
या शिबिरात चांडोली गावचे ग्रामस्थ तसेच पुणे जिल्हा पोलीस मित्र समितिच्या उपाध्यक्ष मयुरी ताई वाघमारे, जि. प्र. शाळेचा नन्हीं कली चा शिक्षिका. कदम मॅडम, सद्गुरू चैतन्य मेडिकल चा पल्लवी ताई वाघमारे अन्य मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात महिलांना होणारी गुढगेदुखी, मधुमेह, हृदयावीकार, उच्च रक्तदाब, मेंदूचे विकार, सांधेदुखी, आतड्याचा आजार, पित्तषयांचे आजार अशा सर्व आजारावर मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी शरीरातील चरबीचे मोफत विश्लेषण, मोफत व्यायाम, आहार मार्गदर्शन, मोफत बॉडी चेकअप , महिलांसाठी विशेष मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. या कार्यक्रमाचा वेळी जागतिक आरोग्य सल्लागार :- श्री. संतोष येवले सर व सौ. छाया येवले मॅडम उपस्थित होते.
आरोग्य सल्लागार :- श्री. भरत गजानन मावळे सौ. अलका मावळे.
आयोजक :- सौ. प्रियांका वाघमारे, मेघा रुपेश सावंत, कोमल सचिन सावंत, भाग्यश्री दीपक सावंत, अनिता अनिल डोळस, यांचा सहकार्याने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.