
दैनिक चालू वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :-दिनांक २ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारांमध्ये अमरावती जिल्हा पुरुष संघाने तृतीय क्रमांक मिळवला.या संघाने गटातील यवतमाळ,औरंगाबाद व पुणे या तीनही संघाना नमवून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळविला.उपांत्य फेरीचा सामना जळगाव जिल्हा संघा बरोबर पराभव स्वीकारत तृतीय क्रमांकाच्या सामन्यांमध्ये अहमदनगर संघास ३-२ होम रनने तृतीय स्थान प्राप्त केले.या संघामध्ये अभिजीत इंगोले,सौरभ टोकशे,प्रतीक डुकरे,हर्षद जळमकर,निखिल कडू,अभिजीत फिरके,आशिष झिमटे,प्रणव दंडाळे,वैभव वाघमारे,मंगेश इंगोले,निखिल देशमुख,प्रफुल मनगटे अंशुमन डोकरे,रोहित तराळे,उत्कर्ष खुरकटे या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदक तालिकेत राज्यात अमरावतीचे आपले स्थान कायम ठेवले.या संघाचे संघ प्रशिक्षक म्हणून डॉ.विकास येवतीकर,श्री.वैभव अर्डक तसेच प्रा.चंद्रशेखर इंगोले यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.सदर संघाचे अमरावती सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.हेमंत देशमुख,डॉ.जी.व्ही.कोरपे (प्राचार्य श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय),श्री.पंकज गुल्हाने,डॉ.सुरेंद्र चव्हाण, श्री संतोष सावरकर,श्री.सचिन पाटणे,श्री.संतोष इंगोले,श्री.समीर सिंग चव्हाण व डॉ.सुरज येवतीकर (सचिव अमरावती सॉफ्टबॉल असोसिएशन) यांनी अभिनंदन केले.