
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
जागतिक पत्रकार दिनानिमित्त इस्लापूर पोलीस ठाण्याच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या शुभहस्ते इस्लापूर परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा शाल श्रीफळ हार घालून सन्मान करण्यात आला. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने इस्लापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्ये साधून इस्लापूर पोलीस ठाण्यात पत्रकार दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत केले व सर्व इस्लापूर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या या भागातील व परिसरातील जेष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड, गंगाराम गड्डमवाड , गौतम कांबळे, परमेश्वर पेशवे, गणेश जयस्वाल,विलास भालेराव, ईश्वर जाधव, प्रमोद जाधव, युवा पत्रकार गजानन वानोळे , किरण वानखडे, विशाल भालेराव,रावसाहेब कदम, दशरथ आंबेकर, प्रेम जाधव. राजेश गायकवाड, इम्रान घोडके, या सर्व उपस्थित पत्रकारांना शाल श्रीफळ व पुष्प हार घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला, ज्येष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड व गंगाराम गड्डमवाड,
यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी इस्लापूर पोलीस प्रशासनाचे कर्मचारी पोलीस उप सहाय्यक निरीक्षक निवळे पाटील,पोलीस उप सहाय्यक निरीक्षक कांबळे,गणेश कोतुलवार व पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.