
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोह्यातकाँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट
—————————————
महाराष्ट्रात राजभवनातून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,माता सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात बोलले जात आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लोहा येथे काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या निवासस्थानी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
आज दि. ७ जानेवारी २०२३ रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
माजी मंत्री डी.पी.सावंत,आ.मोहन अण्णा हंबर्डे,,आ.अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे महाराज, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, सुरेन्द्र घोडजकर, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मोरे, माजी जि.प. सदस्य श्रीनिवास मोरे, माजी अध्यक्ष रंगनाथ भुजबळ, नगरसेवक बबनराव निर्मले, संजय लहानकर, काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत पवार,
माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, पंकज परिहार,संतोष पांडागळे,
अल्पसंख्यांचे शेरफोदिन शेख, पांडुरंग शेटे , अनिल दाढेल माजी नगरसेवक उत्तम महाबळे,, दिंगाबर डिकळे, काशिनाथ भारती, मारोती माली पाटील , उध्दव डिकळे,यांच्या सहित मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, शरद पवार यांच्या निवासस्थानी आज शुभेच्छा देण्यासाठी आलो.
खऱ्या अर्थाने मी लोहा -कंधार मध्ये माजी आ. कै. केशवराव धोंडगे साहेब यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलो होतो.
तसेच शरद पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो. शरद पवार यांच्या राजकीय जीवनात चढ उतार झाले. त्यांच्या पत्नीचे दुःख त निधन झाले तरी ते दगमगले नाहीत. राजकारणात चढ-उतार मी ही पाहिले .शरद पवार यांना जाणिव झाली आहे. आपण काम करतो तिथे त्यांना किंमत नव्हती त्यामुळे ते आमच्याकडे आले. तुमच्याशी कुणी दंडी मुडपीने काम करीत असतील तुम्हाला दाबण्याचे काम करीत असतील तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
लोहा नगर परिषद ताब्यात घ्या येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम दडपण्याचे काम होत आहे. मी पालकमंत्री असताना लोहयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांच्या विकासासाठी ७५ लक्ष रुपयांचा निधी दिला होता तेव्हा या सरकारने या निधीसह अनेक कामे रद्द केलेत . घाबरू नका पक्की भूमिका घेयाला शिका राजकारणात काही होत नाही येथ़े कालपरवा जे झाले ते योग्य नाही ते लोहा नगरीला न पटणारे झाले. तुम्ही चांगले काम करा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी केले त्यांनी ही विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.