
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
शिक्षण महर्षी,
कृषीतज्ञ,प्रख्यात हिंदी पंडीत,एक आदर्श व्यक्तिमत्व स्व.मधुकरराव पा.खतगावकर
यांच्या द्वितीय पुण्यस्मृति दिनानिमित्य श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ता देगलुर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र
अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश वनंजे,धनाजी पा.मोरे,माधव कदम,राजेश बामणे,दिगंबर खिसे,विठ्ठल वाघमारे, बालाजी पेटेकर,अंजली देशमुख,बालाजी बारडवार,दिलीप पाटील,अंकमवार मामा अदिनी स्व. मधुकरराव पाटील खतगावकर यांना आदरांजली वाहिली.