
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – पेनुर येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला श्री सय्यद बाबा दर्गा व ऊर्सानिमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन 12 जानेवारी व 13 जानेवारी रोजी आयोजन केले असून या यात्रा महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी माळेगाव यात्रे नंतर येणाऱ्या पेनुर येथील सय्यद बाबा यात्रा महोत्सवाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये पेनुर सर पेनुर परिसरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या भक्ती भावाने या यात्रा महोत्सवामध्ये सहभागी होऊन महोत्सवाचा आनंद घेत असतात. या यात्रा महोत्सवाचा विशेष म्हणजे या दर्ग्यामध्ये दररोज तेलाचा दिवा, अखंडितपणे सुरू असतो परिसरातील भाविक मोठ्या भक्ती भावांनी दर गुरुवारी या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी अक्षरशः महिला पुरुषांसह लहान बालकांची ही दर्शनासाठी रांग पाहण्यास आजही दिसते. दर्शनासाठी आलेले भाविक मोठ्या भक्ती भावाने दर्ग्यामध्ये बेल फुल, अगरबत्ती, उद, साखर घेऊन येऊन या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी येत असतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून अखंडितपणे सुरू असून या दर्ग्याचे परिसरामध्ये खूप मोठे महात्म्य असून या दर्ग्याची खूप मोठी ख्याती आहे.
गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री भव्य संदल महोत्सवाचे आयोजन संदलचे मानकरी माजी सरपंच रामदास पाटील गवते, लक्ष्मण पाटील गवते, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा प्राचार्य डॉ. अशोक पाटील गवते यांच्या वतीने भव्य संदल मिरवणुकीचे आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात येणार आहे.
प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सौ कुंदा पाटील पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी गुरूवारी सायंकाळी ७:०० वाजता आयोजित केला असुन परीसरातील सर्व लावणीप्रेमीनी यांचा लाभ घ्यावा अशी विनंती याञा कमिटी महोत्सवाने केली आहे.
शुक्रवार दिनांक 13 जानेवारी रोजी भव्य कुस्त्या फडाचे उद्घाटन एडवोकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगे यांच्या हस्ते होणार असून माजी आमदार रोहिदास रावजी चव्हाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्या उपस्थितीत भव्य कुस्तीच्या फडाचे उद्घाटन होणार असुन या पहिली कुस्ती 2001 दुसरी कुस्ती 3001 रुपये, व शेवटची कुस्ती 5001 रुपये असून या कुस्ती फडाचा परिसरातील सर्व कुस्तीप्रेमींनी लाभ घेण्याचा आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक १२ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पेनुर येथील याञा महोत्सवात परीसरात व्यापारी , भावीक , भक्तांनी उपस्थित राहुन शोभा वाढवावी असे आव्हान पेनुर येथील याञा कमिटीने केले आहे.