
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पिंपळदरी :- लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथे दिनांक ८जानेवारी २०२३रोज रविवारी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात होणार आहे व दि.१५ जानेवारी रोजी नारायणदेव यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहातील दैनदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण,१० ते १२ गाथा भजन ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ रात्री ९ ते ११ हरी किर्तन त्यानंतर हरीजागर होईल.सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व नारायणदेव यात्रा आयोजित केली आहे.तरी या प्रसंगी आपण कार्यक्रमास उपस्थित राहून किर्तन श्रवणाचा व यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी पिंपळदरी यांनी कळविले आहे.दररोज नामांकित किर्तनकाराचे किर्तन होणार आहेत.किर्तन , ज्ञानेश्वरी पारायण, नारायणदेव यात्रा उत्सवाचा लाभ घेऊन सहकार्य करावे.दिनांक १५ जानेवारी २०२३ रोज रविवारी यात्रा व दुपारी ठीक २ वाजता सार्वजनिक भंडारा (महाप्रसाद) आयोजित केला आहे.कार्यक्रमाचे स्थळ श्री.दक्षिणमुखी हनुमान मंदिर पिंपळदरी नोट:- पिंपळदरी हे गाव मारतळा ते हाळदा रोडवर हिंदोळा पाटीपासून पुर्वेस २ किमी अंतरावर आहे.अशी माहिती सरपंच श्री.संतोष देवराव पाटील जाधव पिंपळदरीकर यांनी दैनिक चालू वार्ताला कळविलीआहे.