
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील शिवणी जामगा येथे दिनांक ८ जानेवारी २०२३ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गावकरी मंडळी शिवणी जा यांच्यावतीने करण्यात आले असुन या अखंड हरिनाम सप्ताहमध्ये दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत यामध्ये नित्यनियमाने दररोज होणारा पहाटे ४ ते ६ काकड आरती सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण १० ते १२ गाथा भजन शिवणी जामगा येथील गावच वारकरीभुषण
भागवताचार्य श्री ह भ प ज्ञानोबा माऊली महाराज भालके शिवणीकर यांच्या रसाळ वाणीतून भाविक भागवत कथा भक्तांना एकावयास मिळणार आहे , सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ रात्री ७ ते ८ भावार्थरामायण आणि रात्री ९ ते ११ हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे , दिनांक ८ जानेवारी रोजी कीर्तनकार ह भ प माणिक महाराज शास्त्री गंगाखेडकर महाराज यांचे रात्री ९ ते ११ हरिकीर्तन होणार आहे ,दिनांक ९ जानेवारी ह भ प माउली महाराज शिदंगीकर यांचे हरिकीर्तन होईल दिनांक १० जानेवारी मंगळवार एकनाथ महाराज हरसदकर यांचे हरिकीर्तन ११ जानेवारी बुधवारी नामदेव महाराज फफाळ सोनपेठ , १२ जानेवारी गुरूवारी रात्री ९ ते ११ ह भ प मधुकर महाराज सायाळकर यांचे दिनांक १३ जानेवारी रोज शुक्रवारी श्री ह भ प गुरुराज महाराज देगलूरकर यांचे हरिकीर्तन तर दि, १४ जानेवारी शनिवारी रोजी पुरूषोत्तम महाराज बावसकर यांचे ९ ते ११ हरी किर्तन होईल, १५ जानेवारी रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत अखंड हरिनाम सप्ताह मध्ये काल्याचे किर्तन श्री ह भ प ज्ञानोबा माऊली मुडेकर महाराज यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे , तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी शिवणी जामगा यांनी केले आहे.