
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा
बदलत्या वातावरणामुळे विविध आजारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढून दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे औषधीयुक्त असलेल्या पपई फळाची मागणी वाढली आहे. फळे आरोग्यासाठी चांगले असतात. परंतू या फळांची आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहित नसतात. पपई उष्ण असल्याने उन्हाळयात खावू नये अशी चर्चा होते. मात्र पपईमध्ये विविध औषधी गुण आहेत. सध्या थंडीला सुरूवात झाल्याने थंडीमध्ये पपई या फळाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे सध्या पपईची मागणी वाढली आहे. त्यामुळे पपईला आता अच्छे दिन आले आहेत.
बाजारात स्वस्त मिळणारी पपई सध्या महाग झाली आहे. महाग असतांनाही पपईला मागणी वाढली आहे. दहा ते विस रुपये किलोप्रमाणे मिळणारी पपई आता ३० ते ४० रुपये किलो पर्यंत पोहोचली आहे.
त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारीदेखील सुखावला आहे.पपईमध्येक जिवनसत्व आहे तसेच ‘अ’ जिवनसत्वाचे प्रमाणही चांगले आहे. पपईमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. जेवणाच्या वेळा बदलणे. काही बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे तसेच वातावरणातील बदल यांच्या शरीरावर विपरित परिणाम होवून पचनशक्ती घटते. मात्र पपई खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. याशिवाय पपईमध्ये असणारे फायबर्स भुके वरील नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त ठरते. पपई खाणे यामुळे शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलीत राहण्यास मदत होते. एकंदरी पपई या फळाचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असून सर्वच ऋतुमध्ये या फळाची मागणी आता वाढू लागली आहे.