
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री ,रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
यवतमाळ येथे पोलिस वर्धापन दिन चे निमीत्त साधुन यवतमाळ पोलिस दलातर्फे 21 कि.मी अंतराची सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत नारायणलीला इंग्लीश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी कु. प्रिया पिसरवार या विद्यार्थिनीने भाग घेतला आणि तब्बल 21 किलो मिटर पर्यंत सलग सायकल चालवत प्रथम क्रमांक पटकावला.
“इवल्याश्या वयात ही कामगिरी करणे सोपे नाही”
असे गौरवोद् गार माननीय पोलीस अधीक्षक डॉ. श्री.पवन बनसोड सर यांनी व्यक्त केले व प्रिया ला मंचावर बसण्याचे मान दिले व तसेच प्रियाला ढाल व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला….
प्रियाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना व नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूल मधील गुरुजनांना दिले,
शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली ठाकरे मॅडम आणि सर्व शिक्षक तथा शिक्षिकांनी या विद्यार्थीनिचे शाळेत सत्कार केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोद जी बूब सर यांनी या यशाची दखल घेत कु प्रिया पिसरवार आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले…