दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम : राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या कार्य पद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन भूम नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या उपस्थितीत मंत्री सावंत यांच्या पुणे येथील कार्यालयात शनिवारी तालुक्यातील अंतरवली ग्रामपंचायत चे सरपंच राधाबाई जयराम डोके , ग्रा प सदस्य बापू पगारे , स्वाती गव्हाणे , अन्वर शेख , तर माणिक डोके यांनी उद्धव सेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला . जेजला ग्राम पंचायतचे सरपंच उर्मिला संजू शिंदे , ग्रा पं सदस्य अज्ञानबाई दादा गटकळ , सागर भोसले , माजी सरपंच हनुमंत होगले , औदुंबर गोलेकर व संजू शिंदे यांनी तर बावी ग्राम पंचायतचे ग्रा पं सदस्य दत्ता निरफळ , शिवाजी पन्हाळे , संतोष कांबळे यांनी तर तिंत्रज – नळी ग्रा पं च्या सरपंच कल्पना किरण शिंदे , ग्रा पं सदस्य शाम हराळ , शांतीलाल हराळ , बिरमल हराळ , तर मनोहर साबळे , तात्यासाहेब लांडे , भाऊसाहेब साबळे , धर्मराज साबळे यांच्यासह अनेक सदस्य,कार्यकर्ते या सर्व मान्यवरांनी “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी प्रवेश केलेल्या सर्व सरपंच,उप सरपंच,सदस्य व कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांचे पक्षात स्वागत केले व गावच्या विकास कामासाठी सदैव तत्पर व कटिबद्ध असल्याचे मंत्री सावंत यांनी सर्वांना अश्वाशीत केले.या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यात आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,ग्रामपंचायत यासारख्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर “बाळासाहेबांची शिवसेना”(शिंदे गट) पक्ष अधिक बळकट होणार असल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले व सर्व शिवसैनिक,पदाधिकारी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विचार गावागावात व घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले. यावेळी साडे सांगवीचे माजी सरपंच अप्पासाहेब कसबे , परांडा युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके , माजी जि प सदस्य दत्तात्रय गायकवाड , मयूर कसबे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.


