दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
सामाजिक व शैक्षणिक कार्यात सतत अग्रेसर असणारे जिल्हा परिषद भाद्रा येथील मुख्याध्यापक विठुभाऊ चव्हाण यांचा वाढदिवस लोहा शहरासह तालुक्याभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी येथे शिक्षकांच्या समस्या निर्भीडपणे मांडणारे एक आदर्श व्यक्तिमत्व शिक्षक नेते श्री विठूभाऊ चव्हाण सर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन दैनिक चालु वर्ताचे विभागीय संपादक श्री गोविंद पाटील पवार यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एम डी बटलवाड तसेच सहशिक्षक गोड सर व सौ श्रीमंगले मॅडम आणि सर्व विद्यार्थ्यांनी विठू भाऊ चव्हाण सरांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला


