दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
( मुखेड ):- तालुक्यातील राजुरा (बु.) येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. सुभाष हिवराळे वन्नाळीकर यांची मूप्टा शिक्षक संघटनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.याबाबतचे नियुक्तीपत्र अतिथी सभागृहात दि.8 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या कार्यकारणीच्या निवड मेळाव्यात मुप्टाचे संस्थापक सचिव मा. श्री.सुनीलभाऊ मगरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर वाहूळ प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या निवडीचे संस्था अध्यक्ष श्री.श्रीरामजी पाटील राजूरकर साहेब,(मा.अध्यक्ष जि. प. नांदेड ) मुख्याध्यापक श्री. व्यंकटराव रानशेवार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. शिक्षक श्री गोपाळ कदम, प्रा. हणमंत पाटील श्री.उदगीरे सर ,गव्हाणे सर ,बत्तूलवाड सर , वजीरे सर ,प्रा.पाटील एम.बी., प्रा.मुंगडे,प्रा.वाघमारे प्रा.श्रीमंगले प्रा.जाधव टी एम.नवनाथ पोटफोडे,हनुमंतराव डोपेवार, महादेव कदम, पंढरी कारागीर प्रयोगशाळा सहायक अशोक जाधव, रघुनाथ गजले,आनंद जंगमवाड व शिक्षकेतर कर्मचारी झरे, राऊत या सर्वानी शुभेच्छा दिलेले आहेत.
या निवडीमुळे सर्व शिक्षक, समाज माध्यमांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे


