दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
कोरेगांव तालुक्यांच्या मध्य शहराच्या भागात आणि ग्रामीण भागामध्ये घरफोडीचे प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून. तालुक्यांच्या कोरेगांव पोलीस ठाण्यांचा तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्या कार्यकाळात कोरेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून श्री.नितीन सावंत यांनी पदभार स्वीकारला होता. पोलीस निरीक्षक सावंत यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यासमवेत तालुक्यांच्या ठिकाणी अवैध-धंद्यावर चांगलीच छाप टाकली आहे. यामध्ये चार दिवसापूर्वी कोरेगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील शहरांच्या मध्य भागामध्ये कृषीभूषण नावाच्या गोडाऊनचे कोणीतरी अज्ञात चोरट्यांने लॉक तोडून आत प्रवेश केला. यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या हाती दुकानांतील बराच मुद्देमाल लागला. याप्रकरणी कोरेगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सावंत यांनी एक विशेष पथक तयार करुन घटनास्थळाला भेट देवुन आजूबाजूच्या लोकांकडे सखोल चौकशी करुन सी.सी टीव्ही फुटेची पाहणी करुन तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे गोपनीय माहितीच्या आधारे सदर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून यामध्ये चोरीचा प्रकार चार इसमांनी घडवून आणण्याचे पोलीस तपासांमध्ये निष्पन्न झाले. या तपासामध्ये दोघांना कोरेगांव पोलिसांनी अटक केली व त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या कीटक,नाशक औषधांच्या पिशव्यांपैकी असा एकूण २,५८ ४००/रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन सावंत सपोनि श्रीमती अर्चना शिंदे पोलीस अंमलदार सचिन साळुंखे प्रमोद जाधव समाधान शेडगे अविनाश घाडगे अमोल कणसे आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. कोरेगांव पोलिसांच्या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक केले.


