दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:चंदन चोरी करणारे चोरांना पाठलाग करून पकडण्यात मरखेल पोलिसानां यश. दि. ०९/०१/२०२३ रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास वझर ते कबीरवाडी पांदण रस्त्यावर चंदण झाडाची चोरी करत असल्याची गुप्त माहिती मरखेल पोलिस ठाण्यास मिळाल्याने, पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी जावून धाड टाकली, स पो नि मद्दे यांनी आपल्या पोलिस शिपाई सह हे कॉ. शेख, पो कॉ विष्णु यंगाले, पो. कॉ. विष्णु चामलवाड, पो. कॉ. भुले असे
घटनास्थळी जावून चंदण चोरी करणारे चोरांचा पाठलाग करून पकण्यात यश मिळाले.व चंदन तस्करी आरोपी.विजयकुमार पिरूपसिंग राठी वय २७ वर्षे, नरसिंग पि. रामशेट्टी जाधव वय ३१ वर्ष, संदीप पि. किशन जाधव वय २० वर्षे, असे तिघे रा. बसीराम नाईक तांडा ता. औराद जि. बिदर राज्य कर्नाटक असे असून त्याच्या ताब्यात चंदण वजन ९ किलो ६०० ग्रॅम एक कुंदळ, एक वाकस, दोन खिकर व हिरो कंपनीची मोटार सायकल क्र. KA-38-S- 9744 असे मुद्दे माल मिळून आले. वरील चोरांना पुढील कारवाई वनविभाग कार्यालय देगलूर यांच्याकडे सोपवण्यात आले असून अशी माहिती मारखेल पोलीस स्टेशन ने दिली.


