दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि गझल मंथन साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ जानेवारी रोजी मुंबईत महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा राज्यस्तरीय गझल मुशायरा आणि एक दिवसीय नि:शुल्क मराठी गझल लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे.
पहिल्या सत्रात होणाऱ्या गझल लेखन कार्यशाळेत नवोदित गझलकारांना सुप्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड, सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे, सुप्रसिद्ध गझलकार शांताराम (शाम) खामकर हे मार्गदर्शन करणार आहेत. सुत्रसंचलन डॉ. सुजाता मराठे करतील. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात ही भव्य गझल लेखन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी मनोज वराडे ( 8806544472) यांच्याशी संपर्क साधावा.
दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते ५ दरम्यान गझल मुशायरा रंगणार आहे. या मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी गझलकार प्रमोद खराडे (पुणे) राहतील. तर मुशायऱ्यात डॉ. कैलास गायकवाड (नवी मुंबई), शांताराम खामकर (अहमदनगर), प्रदीप तळेकर (पुणे), पूर्णिमा पवार (रत्नागिरी), बा. ह. मगदुम (पुणे), मानसी जोशी (ठाणे), सुनेत्रा जोशी (रत्नागिरी), ॲड. मुकुंदराव जाधव (जळगाव), यशश्री रहाळकर (नाशिक), डॉ. सुभाष कटकदौंड (रायगड), डॉ. मंदार खरे (पुणे), एस. जी. गुळवे (पालघर) सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे (नंदुरबार) करतील. कार्यक्रम प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व) मुंबई येथे होणार आहे. गझल रसिकांनी या मुशायऱ्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे,सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धी प्रमुख भरत माळी, मुंबई जिल्हाध्यक्ष मनोज वराडे, उपाध्यक्षा सुवर्णा जाधव, सचिव प्रणाली म्हात्रे, कोषाध्यक्षा जयश्री भिसे, सहसचिव सुधा गोखले, संयोजक ज्योती जाधव, पुष्पा कोल्हे, जयश्री चौधरी, प्रतिमा शहा आणि मुंबई जिल्हा कार्यकारिणीने केले आहे. गझल मुशायरा संमेलनात निवड.


