दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी- विष्णु पोले.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने आपणास सविनय सादर.
जगात वेगवेगळे धर्म,पंथ,जाती,चालिरिती आहेत.काही राष्ट्र विज्ञानाची कास धरून आज प्रगतीपथावर आहेत.धर्म आणी विज्ञान हे वेगवेगळे आहेत.ज्या राष्ट्रावर धर्माचा प्रभाव अधिक त्यातली मूल्य समाजात अधिक रुजलेली असतात.विज्ञानाचा स्वीकार करूनही प्रभाव धर्मचा असल्यामुळे त्या त्या राष्ट्राची जीवनमूल्य वेगवेगळी असतात.
भारतीयात अनेक विविध धर्म आहेत.त्या त्याधर्माचा प्रभाव त्यातल्या समाजावर असतो.हिंदूधर्माचे वैशिष्टीय असे की,तो बाह्य भागापेक्षा अंतःकरण पवित्र ठेवण्यात अधिक धन्यता मानतो.इतरांच्या आपल्या हातून अहित होऊने असे तो मानतो.या ही पुढे अनेकांनी अंतर्मुख होऊन आत्म्याच्या मुक्त स्वभावाला जाणून घेतले आहे.
स्वामीजी म्हणतात की,प्रत्येक ह्रदयात उद्दात भाव,बल,पौरुष याबाबींचा उगम झाल्याशिवाय त्या हातून उद्दात कर्म घडू शकत नाही.ही बाब ज्ञान योगात सांगतात की,दुबळेपणा निर्माण करणाऱ्या खुलंचट समजूतीला जीवनात ह्रदयात अजिबात थारा देऊ नका .केवळ सत्यच जीवन देत असते आणी सत्याची कास धरण्यखेरीज इतर आणखी कशानेही आपण बलवान होऊ शकणार नाही माणसाचे मन दुबळे करणारी मत प्रणाली आपली मने रोगट, विक्रत होतात.ती इतकी की कालांतराने आपण सत्याच्या आकलनास आणी जीवनात ते आचरण्यास जवळ जवळ अपात्रच होऊन जातो .म्हणून आपणाला बलाची आवश्यकता आहे.
भवरोगावर् बल हेच एकमात्र रामबाण औषध आहे.श्रीमंत, गरिबांना पायदळी तुडुवू लागतात, विद्वान लोक अडाण्यांना दडपून टाकतात,पापी लोकांच्या जुलमानि गांजले जातात त्या वेळी बल हेच त्याचा प्रतिकार करू शकते.ज्या वेळी सगळीच्या सगळी जबाबदारी आपल्याच खांद्यावर पडते .त्यावेळी आपण जितक्या उच्च आणी उत्कृष्ट रीतीने काम करू तितके आणखी इतर कोणत्याही परिस्तिथीत करू शकणार नाही.
तान्हे मूल पाहताच आपण निस्वार्थ होऊन जातो.सारिच जबाबदारी आपल्यावर येताच पापाच्या साऱ्या वृत्ती आपोआपोच मालवतील मग आपल्या ठायी असलेली श्रेष्ठता आणी उद्दात भाव व्यक्त होईल.माझ्या दैवाला मात्र मीच जबाबदार आहे.मला कशाचेही बंधन नाही.
मीच सचिदानंद आहे हा जयघोष वाढत जाईल.सत्य ह्रदयात भिनेल,ज्ञानदीकराची मंगळप्रथा आपल्या जीवनात जशी जशी वाढत जाईल तसे तसे मोह विरून जातील.अज्ञान अंधःकाराच्या राशीच्या राशी अंतर्धान पावतील अखेर अविदयातवमाचा संपूर्ण विधवंश होऊन ज्ञान रवी आमचे जीवन उजळून काढील.प्रार्थना,बल,याची जीवनात आराधना करा.वाईट वृत्तीना चुकून थारा देऊ नका.हे जीवन सफल होण्यासाठी ज्ञानयोग हा मानवजातीसाठी महामंत्रा प्रमाणे होय.
आपण प्रत्येकजण काही ना काही कर्म करित असतो.कर्मविना आपण स्वस्थ बसू शकत नाही.मग कधी चांगले तर कधी वाईट असे कर्म घडतच असते.आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी या मनावर झालेल्या संस्कारावर बऱयांच अवलंबून असतात.
स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन बाहेर जाणारी मनाची समस्त बहिर्गामी शक्ती इस्त्तात विखरून क्षिण होऊन जातात .तुमच्या शक्ती विकासाला हातभार लावू शकत नाही पण तेच जर आपण संयत केले तर तुमची अंतस्थ शक्ति वृद्धींगत होते.या संयमातून इच्छाशक्ती जन्मास येईल.त्यातून चारित्र्यवान पुरुष निर्माण करील मग नुसत्या इशाऱ्याने उठणे,बसणे होईल.
अज्ञानी जनाला हे रहस्य नसते तरी सत्तेसाठी हावं मात्र धरतात .काम करून वाट बघितल्यास आपलाही अंमल गाजविता येईल हे निर्बुद्धीच्या ध्यानात येत नाही.आपल्या अज्ञानाला पायबंद घाला तुच्छ लाभासाठी आपण शेजाऱ्यालाही फसवितो .पण तो लाभ आवरून धरू शकलो तर आपण इच्छा जी केली जाईल ते आपणास प्राप्त होईल.आपण संकुचित वर्तुळात भरकटत असतो.आपली दुर्बलता हाच आपला कमकुवत पणा होय.
जो नित्य परकाष्टेचा कर्म शील असतो प्रखर कर्म शील मधेज्याला मरू भूमीच्या निस्त बद्धतेची प्रचिती येते.त्यालाच संयमाचे रहस्य कळले आहे.अत्यंत वरदलीच्या रस्त्याने जाताना देखील चिताची शांती ढलत नाही कर्मात कमालीचे गढून गेलेले असतो हाच कर्म योगाचा आदर्श होय.ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकल्यास आपल्याला खरोखर कर्माचे रहस्य उमजले असे म्हणता येइल .
हे सर्व करण्यासाठी पायापासून सुरुवात करावी लागते.हाताशी जे जे म्हणून कर्म येईल ते करताना सर्वात अगोदर स्वतःला निस्वार्थ बनण्याचे वळण लावावे .कर्माच्या पाठीमागे असलेला हेतू कोणत्या कार्यास प्रवर्त करित आहे हे आपण शोधून काढले पाहिजे सुरुवातीला आपल्या समोर स्वर्थाने लडबडलेले दिसेल परंतु चिकाठी धरल्यास ती स्वार्थी मालिनता हळू हळू कमी होत जाते.
अधून मधून निस्वार्थ सेवा वा कर्म करण्यास समर्थ होऊ तेंव्हा अशा वाटू लागते जीवनाच्या मार्गात क्रमश: पुढे जाताजाता आज ना उद्या केंव्हा तरी असा एक सोन्याचा दिवस उगवेल की ज्या दिवशी आपण यतार्थ पणे स्वार्थ गंधशून्य होऊन जाऊ आणी ज्या मंगल क्षणी आपण असे निस्वार्थ होऊ त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एक जागी केंद्रिभूत होईल आणी आपल्यातील अंतस्थ ज्ञान प्रकाशित होईल.
श्री. दयानंद मा.बिरादार
साने गुरुजी विदयालय येस्तार
8767712994


