भारतीय महिला संघाची ‘या’ समिकरणाने लागेल लॉटरी…
भारतीय महिला संघ आयसीसी महिला एकदिवसीय २०२५च्या सेमीफायनलमध्ये पोहचला आहे.
काल गुरुवारी, २३ ऑक्टोबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला आहे. पण आता भारत अंतिम सामना खेळणार आहेत, तुम्हाला आता धक्का बसला असेल? की असे का? सेमीफायनल सोडून अंतिम सामना का? परंतु, महिला एकदिवसीय विश्वचषकाचा इतिहास स्वतःच सांगत आहे, या आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे टीम इंडियाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा आता उंचावल्या आहेत.
भारत अंतिम सामना खेळणार?
सेमीफायनल न खेळता आणि जिंकल्याशिवाय भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकणार नाही. हे सत्य आहे, पण गोष्ट अशी आहे की, आता सेमीफायनलबद्दल आता तेवढा दबाव नाही. कारण भारताने न्यूझीलंडला पराभूत केले आही आणि महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा असे घडले आहे, तेव्हा भारताने निश्चितच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासामध्ये भारताने आतापर्यंतच्या १४ सामन्यांमध्ये न्यूझीलंडला फक्त तीन वेळा धूळ चारली आहे. पहिल्यांदा २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या त्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताने न्यूझीलंडला ४० धावांनी पराभूत केले आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.
तसेच, २०१७ मध्ये महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताने न्यूझीलंडला दुसऱ्यांदा पराभूत केले होते. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या त्या आवृत्तीत, भारताने १८६ धावांनी मोठा विजय मिळवला होता आणि येथेही ते अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
चालू महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारताने न्यूझीलंडला हरवण्याची तिसरी वेळ ठरली आहे. भारताने डकवर्थ-लुईसच्या पद्धतीनुसार ५३ धावांनी विजय मिळवला. या मागील इतिहास बघता, या स्पर्धेत देखील भारतीय संघ अंतिम सामना खेळण्याची शक्यता आहे.
भारताकडून न्यूझीलंडसंघ ५३ धावांनी पराभूत
काल, गुरुवारी २३ ऑक्टोबर रोजी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार ५३ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह, भारत सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. भारताने नाणेफेक गमावून ३ बाद ३४० धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात न्यूझीलंड महिला संघाला ४४ षटकांत आठ बाद २७१ धावाच उभ्या करू शकला.


