दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : जालना तालुक्यातील सोमनाथ येथे जि.प. शाळेत एकच शिक्षक आहे. मात्र दोन शिक्षक मिळावे; यासाठी चिमुकल्यांनी शाळेसमोरच आंदोलन सुरू केले आहे. आता शिक्षण विभाग या चिमुकळ्यांची मागणी पूर्ण करतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
जालना तालुक्यातील सोमनाथ येथे गुरुजींसाठी चिमुकल्यांनी शाळेसमोरच जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. सोमनाथ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन शिक्षकाची नेमणूक असताना एकच शिक्षक असल्याने त्यांना पाच वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत असल्याने वर्षभराचा अभ्यासक्रमही पूर्ण होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
एकच शिक्षक असल्याने त्यांना निवडणूक कार्यक्रम, शासनाच्या विविध कामानिमित्त व रजेवर जायचे असल्यास शाळेला चक्क कुलुप लावावे लागत असते. यामुळे हतबल झालेल्या मुलांनी आज चक्क शाळेच्या प्रांगणात दोन शिक्षक द्या; अशी जोरदार घोषणाबाजी करत शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी केलीय.


