दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी जव्हार -दिपक काकरा.
जव्हार:- सुहासिनी महिला पतसंस्थेची निवडणूक गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडली.या पतसंस्थेच्या संचालक पदी गायत्री गजानन सहाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून एक शिक्षित उमेदवार म्हणून सहाणे यांची ही निवड झाली असल्याचे अन्य संचालक तथा भाग धारकांकडून बोलले जात आहे.पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम आणि पालघर जिल्हा परिषद सदस्या सारिका निकम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गजानन सहाणे यांच्या गायत्री ह्या पत्नी आहेत.सहाणे यांच्या राहत्या घरी जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य यांनी गायत्री सहाने यांचा सहकुटुंब सन्मान करून शुभेच्छा दिल्या.येणाऱ्या काळात सुहासिनी महिला पतसंस्थेच्या हिताचे निर्णय घेऊन बँकेची व्याप्ती अधिकाधिक वाढवून सर्व भागधारकांचे हिताचे काम करण्याचा प्रयत्न करेन असे यावेळी बोलताना गायत्री सहाणे यांनी सांगितले.


