
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा – आजघडीला वानर हे वन जंगल परिसर सोडून अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वसाहतीत मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यात इकडून तिकडे उड्या मारताना तसेच श्वानांच्या हल्यात वानर जखमी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. असाच एक प्रकार लोहा शहरात घडला. श्वानांच्या टोळक्याने वानराचा पाठलाग केयाने घाबरलेले वानर एका विद्युत पोल वरती चढले आसता प्रवाहित तारेला स्पर्श झाला आणि शॉक लागून वानर गंभीर जखमी झाले. त्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले मात्र जखमी वानरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदरील घटना मकर संक्रात दिनी दि. १५ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. मृत वानरावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हिंदू रितीरिवाज व परंपरे नुसार अंत्यसंस्कार केले.
लोहा शहरातील शिक्षक कॉलनी लगत बैल बाजार मैदान परिसरात तीन वर्षीय मादी जातीचे वानर हे मकर संक्रात दिनी दि. १५ रोजी अन्न व पाण्याच्या शोधत आले असता त्याचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला. घाबरलेले वानर जीव वाचविण्यासाठी विजेच्या खांबावर चढले असता त्याचा विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श झाला आणि शॉक लागून वानर गंभीर जखमी झाले. त्यास कांही तरुणांनी तत्काळ पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉ. आर. एम. पुरी यांनी उपचार केले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. वनरक्षक परमेश्वर घुगे यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृत वानरावर कंधार रस्त्यावरील बेनाळ पाटी नजीक भगवान कदम यांच्या शेतात त्यांच्याच परवानगीने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष अंबादास पाटील पवार, बजरंग दलाचे अध्यक्ष पैलवान गणेश पाटील कल्याणकर, चंद्रजीत यादव, सोमेश शिराळे, गणेश बोडखे, शिवाजी शेकापुरे, ऋतुराज चन्नावार, शेतकरी भगवान कदम, लक्ष्मण कदम, नरहारी कदम आदींची उपस्थिती होती.
भटक्या कुत्र्यांपासून वानरास वाचाविनाऱ्या शिवाजी शेकापुरे यांना वानराने चावा घेतल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर लोहा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.