दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
पेठवडज :- शाळा शिक्षक व विद्यार्थी यांना ग्रंथालयाचा सभासद होण्याचा उपक्रम जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत जय मल्हार मार्तंड सार्वजनिक वाचनालय पेठवडज यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा पेठवडज येथे ग्रंथालय शाळेच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना विनामुल्य सभासद करून घेण्यात आले. व ग्रंथालया मध्ये प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांना पुस्तके बदलून देण्याचे व शाळेत पुस्तक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रंथालयाचे सचिव श्री. प्रल्हाद गंगाराम वडगावकर यांनी दिले कार्यक्रमास शाळेचे मुख्याधापक श्री कारभारी पी.जी, श्री.पांचाळ जी व्हीं, श्री.माने एन. व्ही, श्री.केरूरे आर. जी, सौ.माने, श्री.कांबळे एस ए. शिक्षक वृंद उपस्थित होते. व ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री.शशिकांत वडगावकर व सेविका विमलबाई कारभारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


