शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या बच्चू कडूंचे मोठे विधान…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी आंदोलन छेडले आहे. यालयाने आंदोलनाचे स्थळ रिकामे करण्याचा आदेश दिल्यानंतर कडू यांनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच बच्चू कडू आम्हाला अटक करा असं म्हणत पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले होते, मात्र रस्त्यातच सरकारच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दर्शविला आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीबाबत त्यांनी मोठे विधान केले आहे. ज्यामुळे शेतऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील. या बैठकीपूर्वी बच्चू कडून यांनी त्याआधी कर्जमाफी कशी असावी ? यावर भाष्य केले आहे.
जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ज्यांची सरकारी नोकरी आहे, पेन्शन आहे किंवा जे व्यापारी आहेत, ज्यांनी फक्त गुंतवणूक करण्यासाठी, टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतली आहे, अशा शेतकऱ्यांना मुळीच कर्जमाफी मिळू नये. अशा शब्दात स्पष्ट भूमिका त्यांनी माध्यमांसमोर मांडली आहे.
तसेच, डिजिटल इंडियामुळे प्रत्येकाची खरी आर्थिक स्थिती शोधणे सरकारला आता सोपे झाले आहे. त्यामुळे सरकारने गरजवंत शेतकरी लवकरात लवकर शोधावे आणि त्यांना कर्जमाफी द्यावी अशी अशी मागणी केली आहे.
आजच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नाही तर मुंबईवरून नागपूरला परत आल्यावर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. आजच्या बैठकीत कर्जमाफी , पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंदे, 20 टक्के बोनस , हमीभाव याबाबत चर्चा होईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
बच्चू कडू यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय?
शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी.
कृषी मालाला हमी भावावर (MSP) 20% अनुदान देण्यात यावे.
शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे.
पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधुन करावा.
नागपुर – गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा.
दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे-
मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा.


