या देशावरील तब्बल इतके टक्के टॅरिफ कमी; भारतालाही अखेर…
टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. आता अमेरिकेची भारताबद्दलची भूमिका बदलल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. यामधून मार्ग काढण्यासाठी भारताने प्रयत्न केला.
मात्र, टॅरिफ अखेर अमेरिकेने लावला. भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेत होणारी 70 टटक्के निर्यात कमी झाली. चीनवर देखील 100 टक्के टॅरिफ लावण्याची मोठी घोषणा अमेरिकेने केली. 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनवर 100 टक्के टॅरिफ लागणार असतानाच अमेरिकेने मोठा दिलासा चीनला दिलाय. रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणाऱ्या चीनवर अमेरिकेने मेहरबानी दाखवली. चीनवरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला.
भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेने जाहीर केले. चीनच्या तुलनेत भारत रशियाकडून रकमीच तेल खरेदी करतो. जगात सर्वात जास्त चीन हा देश रशियाकडून तेल खरेदी करतो. यामुळे आता भारतावरील टॅरिफ कमी होण्याचे मोठे संकेत आहेत. यासोबतच भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू असल्याचे स्वत:अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प आणि सी जिनपिंग यांच्यातील बैठकीचा फायदा चीनला झाल्याचे स्पष्ट होतंय. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, चीनवरील 10 टक्के टॅरिफ कमी करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय. बुसानमध्ये सी यांच्याशी दोन तासांहून अधिक काळ झालेल्या बैठकीनंतर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आमच्या बरीच चर्चा झाली. विशेष म्हणजे अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर मार्ग निघाली आहेत.
आमच्यात सर्व गोष्टींवर चर्चा झाली. ती खरोखऱच एक चांगली बैठक नक्कीच होती. सोयाबीन खरेदी लवकरच सुरू होईल, चीनवरील टॅरिफ 57 टक्क्यांहून 47 टक्क्यांपर्यंत कमी होईल, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आहे तो टॅरिफ चीनवरील कमी होईल. मात्र, 1 तारखेपासून सुरू होणाऱ्या टॅरिफबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरीही त्यांनी आहे त्यापैकी 10 टक्के टॅरिफ कमी करणार असल्याचे म्हटले. यामुळे 100 टक्के टॅरिफ चीनवर लादला जाणार नसल्याचे यावरून स्पष्ट होतंय. अमेरिकेने मोठी मेहरबानी चीनवर दाखवली असून भारताच्या टॅरिफबद्दलही मार्ग निघण्याचे मोठे संकेत आहेत.


